Thursday, April 23, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सिरोंजी, शाळेत वसुंधरा दिन साजरा

खापा, वार्ताहर :- तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय सिरोंजी येथे 22 एप्रिल हा वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. वसुंधरा म्हणजेच आपली पृथ्वी आणि पृथ्वी ही आपली माता आहे. जशी आपली माता आपल्याकरिता सर्व काही करते, तसेच धरणी माता आपल्याला ऑक्सिजन देते. आज ओजोन वायूचा स्तर वाढत आहे, वृक्षांची कटाई होत आहे, सिमेंटीकरण होत, आहे, जंगलातील पानवटे कमी होत आहे, त्यामुळे पशु, पक्षी, मानव तसेच सर्वांचे मानवी जीवन धोक्यात आले आहे. त्याकरिता प्रत्येकाने वृक्षाची कटाई न करता वृक्षारोपण करून तसेच प्लास्टिकचा वापर न करता, कमीत कमी पेट्रोलचा वापर करून सार्वजनिक जीवनात सायकलीचा कसा वापर करता येईल, याचा विचार पर्यावरण रक्षणाकरता करणे गरजेचे आहे.

याप्रसंगी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी पृथ्वी मातेचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर केले. विद्यार्थ्यांनी अनेक उपक्रमामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे यशस्वी करता विद्यालयाचे प्राचार्य संदीप भोंडे यांच्या मार्गदर्शनात प्राध्यापक विजय काळमेघ, ज्ञानेश दळवी, योगिता बुरहान, ज्येष्ठ शिक्षक दुर्गेश्वर चौधरी, रामकृष्ण टेकाडे, दीपक नारे, दिनेश हजारे, शिक्षिका कुमारी, बॉबी पर्वत, पूजा दहीकर, तवले, शिपाई मारुती सोमकुवर, शुभम चटकवार, कुंदा बाजनघाटे सर्वांनी यशस्वी प्रयत्न केले. याप्रसंगी विद्यार्थी प्रेरित झाले. पालकांची सुद्धा विशेष उपस्थिती याप्रसंगी होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com