Home Latest News मिशन २०२७ अंतर्गत २०२७ पूर्वी विदर्भराज्य मिळवणारच – वि.रा.आ.स

मिशन २०२७ अंतर्गत २०२७ पूर्वी विदर्भराज्य मिळवणारच – वि.रा.आ.स

0
42

– २०२७ संपण्यापूर्वी विदर्भ मिळवणारच असा निर्धार

नागपूर :- विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन २०२७ जाहीर केले असून २०२७ संपण्यापूर्वी विदर्भ मिळवणारच असा निर्धार जाहीर केला आहे. ग्रामीण भागात गावागावात विदर्भ आंदोलनाची धग पोहचवण्याच्या दृष्टीने ६ विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळवा त्यात मेळघाट दुर्गम भागातील समावेश आहे. त्याच बरोबर कांरजा लाड- गडचिरोली गोंदिया- अमरावती (बडनेरा) व भंडारातील जनतेचा सहभाग हा वाखारण्या जोगा होता.

विदर्भ राज्य आंदोलन समितीने १२० वर्षापासून पारतंत्र्यात असता पासूनची विदर्भ राज्याची मागणी कायम निकाली काढण्याचा दृष्टीने व १०० वर्षे महाराष्ट्रात राहीले तरी व ब्रम्ह देवाला मुख्यमंत्री केले तरी महाराष्ट्र दिवाळखोरीत निघाला आहे. राज्याचे महसूली उत्पन्न ५ लाख ६० हजार ९६३ कोटी रुपये असून, महराष्ट्रावर असणाऱ्या कर्ज व व्याजाचा बोझा ९ लाख ८३ हजार कोटी रूप्ये आहे. याशिवाय सरकारला १० महिन्यापूर्वी कंत्राटदारांनी केलेल्या बांधकामाचे उदारणार्थ सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, जलसंपदा व जलसंधारन, जलजिवन मिशन, ग्रामविकास नगरविकास व डी.पी.सी च्या बांधकामाच्या एकूण ९५ हजार ७३२ कोटी रूपयाच्या लायबिलीटीज डिस्चार्ज करायचे आहे. असे १० लाख ५९ हजार ४५९ रुपये देण्याची राज्याची अयपत नाही.

शहरी भागात विदर्भ आंदोलनाचा वनवा घरा घरात पेटविन्याच्या दृष्टीने व महाराष्ट्राच्या दिवाळखोरीत निघालेल्या परिस्थितीचे खरे चित्र शहरी जनतेच्या नजरेपुढे आणुन जनजागृती करण्याच्या दृष्टीने व विदर्भाचे स्वतंत्र राज्य हेच या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. हे समजावून सांगण्याच्या हेतूने दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी १२ वाजता नागपूर शहरातील इतवारी ” विदर्भ चंडीका मंदीर” शहीद चौक पासून” लाँग मार्च” चिटणीस पार्क पर्यंत येऊन दुपारी १ वाजता चिटणीस पार्कवर भव्य विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आयोजीत केला आहे.

तरी सर्व जनतेनी सक्रीय सभाग नोंदवावा व लाँग मार्च व मेळावा यशस्वी करावा असे आवाहन विराआस करीत आहे.

दि.३ नोव्हेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती मुख्यालय येथे विराआसची राज्य स्तरीय कोअर कमेटीची बैठक जेष्ठ नेते व प्रसिध्द अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षेतेत पार पडली. या बैठकीला माजी आमदार व विराआस अध्यक्ष अँड. वामनराव चटप, महिला अध्यक्षा रंजना मामर्डे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, पुर्व विदर्भ अध्यक्ष अरूण केदार, पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रा. डॉ. पी.आर. राजपुत, पुर्व विदर्भ उपाध्यक्ष सुनिल चोखारे, कोअर कमेटी सदस्य डॉ.रमेश गजभिये, प्रा. पुरुषोत्तम पाटील, छैलबिहारी अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. आजच्या बैठकीत कोअर कमेटी तात्यासाहेब मत्ते यांना विदर्भ प्रचार प्रमुखपदी तात्यासाहेब मत्ते यांची विराआस अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. या बैठकीला राजेन्द्र सिंह ठाकूर, घीसू खुणे पाटील, कपिल इद्दे, शालीकराव माऊलीकर, नरेश निमजे, राजेंद्र सतई, दिलीप भोयर, निलकंठराव यावलकर, राखी भारव्दाज, वसंत गवळी, अतुल सतदेवे, विजय नवखरे, सुधीर महाकाळकर, ओमप्रकाश तापडीया, राजू अवथळे, गजानन अमदावादकर, डॉ. रमेश चंदनशिव, कृष्णा भोंगाडे, मधुसुदन कोवे, कैलाश फाटे, धोंडबाजी गावंडे, सतिश प्रेमलवार सह संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठया संख्यने उपस्थित होते. विदर्भ राज्य आंदोलन समिती च्यावतीने आज टिळक भवन येथे पत्रकार परिषदेमध्ये मंचावरील ॲड. वामनराव चटप, रंजनाताई मामर्डे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मुकेश मासुरकर, अरुण केदार, तात्यासाहेब मते, सुनील चोखारे, नरेश निमजे आणि प्रवीण राऊत यांची उपस्थिती होती.