spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एमएनएस नेत्यानचा मुलगा नशेत अर्धनग्न अवस्थेत महिलेला शिवीगाळ करत धमकावताना व्हिडिओ व्हायरल; अंधेरीतील प्रकारावरून खळबळ

 

मुंबई ०८ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (एमएनएस) राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांचा मुलगा राहिल जावेद शेख याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यामध्ये तो नशेच्या अवस्थेत, अर्धनग्न अवस्थेत एका महिलेला शिवीगाळ करत, धमक्या देताना दिसतो आहे. हा संपूर्ण प्रकार मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोडवर रविवारी उशिरा घडला.

“मी जावेद शेखचा मुलगा आहे” – महिलेला खुलेआम धमकी

या व्हिडिओमध्ये राहिल शेख हा राजश्री मोरे या महिलेच्या कारला धडक देऊन तिला अर्वाच्य भाषेत धमकी देताना स्पष्ट ऐकू येतो. तो मराठीत ओरडून म्हणतो, “जा आणि पोलिसात तक्रार कर. मी जावेद शेखचा मुलगा आहे. मग बघ काय होतं ते!”

राजश्री मोरे यांनी सोशल मीडियावर स्वतः हा व्हिडिओ पोस्ट करत आपल्यावर झालेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली. त्या यापूर्वी अभिनेत्री राखी सावंत यांच्याही निकटवर्तीय राहिल्या आहेत.

व्हिडिओत काय दिसते?

व्हिडिओमध्ये राहिल हा अर्धनग्न अवस्थेत, मद्यधुंद असल्याचे दिसते. तो “ओ पैसे होते का?”, “जावेद शेखचा मुलगा आहे मी” अशा थेट आणि उद्धट भाषेत बोलताना दिसतो. त्याने महिलेला धक्काबुक्की केल्याचेही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते. त्याच्या सोबत असलेल्या व्यक्ती पोलिसांशी वाद करत असल्याचेही दृश्य आहे.

पोलिसांकडून एफआयआर, आरोपी ताब्यात

अंबोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राहिल शेख याला पोलिसांनी ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून, त्याची गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, व्हिडिओच्या आधारे पुढील तपास सुरु आहे.

राजश्री मोरे यांचा आरोप – “मराठी भाषा थोपवण्यावरून लक्ष्य केले”

राजश्री मोरे यांनी याप्रकरणी गंभीर आरोप करताना म्हटले की, “एमएनएसच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी माझ्यावर केवळ या घटनेमुळे नव्हे तर मी मराठी भाषा सक्तीविषयी व्यक्त केलेल्या मतांमुळे वैयक्तिक टार्गेट केलं आहे.” त्यांनी राहिल शेख याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली असून, पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Popular Articles