राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पांढरकवड्याचा विजयादशमी उत्सव

0
45

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पांढरकवडा नगरतर्फे श्री विजयादशमी उत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. या पवित्र पर्वावर संघाच्या कार्याला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने या वर्षीचा उत्सव विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. हिंदू समाजात पुरुषार्थ, शक्ती आणि एकात्मतेचे प्रतीक मानला जाणारा विजयादशमी हा दिवस संघ कार्याच्या परंपरेत अत्यंत पवित्र मानला जातो. शतकानुशतक चालत आलेली ही परंपरा या वर्षी अधिक भव्यतेने साजरी होणार आहे. शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ७.०० वाजता नगरपरिषद स्टेडियम, पांढरकवडा येथे हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कृष्णराव अण्णाराव देशट्टीवार (वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी) असतील, तर प्रमुख वक्ते गोविंद शेंडे (केंद्रीय सहमंत्री, विश्व हिंदू परिषद) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. नगर संघचालक डॉ. किरण मायी यांनी निमंत्रित सह नागरिकांना आपल्या कुटुंबासह वेळेपूर्वी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाऊस असल्यास कार्यक्रम सुराणा भवन येथे पार पडेल, अशी माहिती देण्यात आली आहे. कार्यक्रमापूर्वी पथसंचलन संध्याकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आले असून शहरात देशभक्तीचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे.