spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नवेगाव नागझीरा व्याग्र प्रकल्प अंतर्गत वन्यजीव सप्ताह साजरा

तिरोडा :-  येथील जिला परिषद शाळेमध्ये नवेगाव नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्र वनपरीक्षेत्र अंतर्गत दि १ आक्टोबर ते ७ आक्टोबर पर्यन्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कुल्पा, जांबोरा, या गावातील शाळेतील विद्यार्थ्यांची रॅली काढून वन्यजीव संघर्ष या बाबद जनजागृती करण्यात आली.

बफर क्षेत्रातील लोणारा, नवेझरी, सीतेपर, सर्रा, मारेगाव, चांदोरी, सोनेगाव, जांबोरा या गावातील शाळेमध्ये वन्यजीव संघर्ष या विषयावर चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा विद्यार्थ्यांचा उत्साह दुगुणित केला.

चोरखामारा पर्यटन रस्त्याच्या दुथरफा असलेल्या अखाद्य वनस्पतीचे निर्मूलन श्रमदानातून करण्यात आले. वन्यजीव सप्ताह निमित्ताने पथनाट्य पथकाद्वारे जांभोरा, सीतेपार, कुल्पा, खेडेपार, लोणारा, सर्रा या गावामध्ये मानव वन्यजीव संघर्ष होऊ नये या बद्दल पथनाट्य द्वारे जनजागृती करण्यात आली.

या विविध कार्यक्रमाचे वन्यजिव सप्ताह निमित्त मा. वनपरिक्षेत्र अधिकारी उमरझरी कु. एस. पी. टेंभरे क्षेत्र सहाय्यक सोनेगाव एल.आर. लिल्हारे, क्षेत्र सहाय्यक लोणारा सौ.आर. एस. गडलिंगे, क्षेत्र सहाय्यक चोरखमारा, कु.पी.टी. गौतम व तसेच वरिल प्रमाने गावातील, पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, ई.डि.सी, अध्यक्ष व सदस्य यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. व वन्यजिव सप्ताह पार पाडण्याकरिता एस.एम. शरनागत, एस. एस. भालेराव, एस. सी. भेलावे, आर. बि. झंझाड, एन. एस. येळे, पी.पी. पंचार, एस. के. गौतम, व्हि .ए. डोंगरे, एस.एच. भोंगाडे, आर. जी. डोंगरवार, एम. एच. कोठेवाड, आर. डब्लु. भोयर, एम.एन. बरडे, डी. पी. डोरले, यु.पी. उंदिरवाडे, टि.पी. चव्हान व सर्व वनकर्मचारी तसेच वडेगाव STPF-02 चे जवान या सर्वाच्या सहकार्यामध्ये वन्यजिव सप्ताह कार्यक्रम पार पाडला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.