spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विश्वब्राह्मण (पंचाळ) जेष्ठ नागरिक मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व प्रतिभावंतांचा सत्कार

नागपूर :- विश्वब्राह्मण (पंचाळ) ज्येष्ठ नागरिक मंडळ, नागपूरचा २० वा, वर्धापनदिन नुकताच जीवनबोध मठ, इतवारी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त समाजातील विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व प्रतिभावंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. प्रतिभावंतांचाही सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे शहर अध्यक्ष सिद्धु उर्फ सिद्धेश्वरराव कोमजवार यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक वाटचालीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक महामंडळ (विदर्भ), नागपूरचे अध्यक्ष अँड. अविनाश तेलंग यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, निवारा तसेच आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक दिनकरराव उल्लेवार, उपाध्यक्ष चंद्रशेखर खुरसवार, सचिव राजेंद्र चोपावार, सहसचिव रत्नाकर यमनुरवार, कोषाध्यक्ष दिनाकर मधुपवार तसेच कार्यकारिणी सदस्य अशोक कासर्लावार, विनायक आमगांवकर, सुभाष श्रीपादवार, अशोक इत्तडवार आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा झालेला सन्मान हा त्यांच्या कार्याची दखल घेणारा तसेच समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी ठरला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.