किशोर साहू, मौदा :- सावित्रीबाई एकता बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित मानवता कॉन्व्हेंट दहेगाव येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रम करण्यात आला.या कार्यक्रमाला संस्थेचे संपूर्ण पदाधिकारी,ग्रा. प. दहेगाव येथील पदधिकारी,उच्च प्राथमिक शाळा दहेगाव विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण गावकरी उपस्थित होते. संपूर्ण प्रमुख पाहुण्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन केल्यानंतर संपूर्ण विद्यार्थी आणि ग्रामस्थांमार्फत रॅली काढण्यात आली. त्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगण्यात आले.




