spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आगामी जिल्हा परिषद च्या निवडणुका मतपत्रिकेने घ्या – काँग्रेसचे भावी जि प चाचेर सर्कल चे उमेदवार मदन बरबटे यांची मागणी 

किशोर साहू, मौदा ,ता. ११:- ईव्हीएम मशीन मुळे अनेक तक्रारी वाढल्या असून, न्यायालयात अनेक प्रकरणे सुरू आहेत. त्यामुळे ईव्हीएम मशीनच्या पारदर्शतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. एवढेच नव्हे तर जगातील महासत्ता असलेल्या देशात सुद्धा निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिकांनी घेण्यात येते, त्यामुळे आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका मतपत्रिकेने घ्यावे अशी मागणी चाचेर – निमखेडा जिल्हा परिषद सर्कलचे काँग्रेसचे भावी उमेदवार माजी सरपंच मदन बरबटे यांच्यासह गांगनेर(हिवरा) सरपंचा अनिता श्रीधर चिंचूलकर, चाचेर सरपंचा लुंबिनी महेश कलारे, माजी सरपंच महेश कलारे, निमखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश  हारोडे, श्रीधर चिंचूलकर,बाळा बर्वे, रितेश जांभुळकर, सह परिसरातील, तालुक्यातील,जिल्ह्यातील, राज्यातील व देशातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी, निवडणूक आयोगाला केल्याचे मदन बरबटे यांनी सांगितले.

Popular Articles