Saturday, April 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वरठी पोलिसांचा वाळू तस्करांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; ५ टिप्परसह २ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज,प्रतिनिधी भंडारा वरठी :- भंडारा जिल्हा पोलीस दलाने अवैध रेती उत्खनन आणि चोरट्या वाहतुकीविरुद्ध आक्रमक पाऊल उचलले आहे. वरठी पोलीस ठाण्याच्या पथकाने मौजा बोथली परिसरात पेट्रोलिंग दरम्यान ५ मोठे १२ चक्का टिप्पर पकडले असून, एकूण २ कोटी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पाचही टिप्परच्या चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

🔹 टिप्पर क्र. MH 40 CM 7750 – चालक/मालक हिवराज देवचंद बारई (३२, रा. बासोरा).

🔹 टिप्पर क्र. MH 40 CT 7770 – चालक/मालक मोहन विजय उके (२५, रा. टाकळी पुनर्वसन).

🔹 टिप्पर क्र. MH 40 CZ 2792 – चालक/मालक नितेश भाजेराम वरकडे (३७, रा. दिघोरी).

🔹 टिप्पर क्र. MH 40 C 74141 – चालक/मालक दिनेश रामभाऊ मस्के (४२, रा. चिचोली, नागपूर).

🔹 टिप्पर क्र. MH 40 CT 2792 – चालक/मालक गंगेश कारुजी हलमारे (३९, रा. बासोरा).

वरठी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना प्रियंका पेट्रोल पंप, मौजा बोथली (ता. मोहाडी) येथे हे पाचही टिप्पर संशयास्पद रितीने उभे असल्याचे आढळले. या टिप्परची पाहणी केली असता, प्रत्येक टिप्परमध्ये १० ब्रास याप्रमाणे एकूण ५० ब्रास रेती विनापरवाना चोरटी वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाख रुपये किमतीचा एक याप्रमाणे ५ टिप्पर (किंमत २ कोटी रुपये) आणि ३ लाख रुपयांची रेती, असा एकूण २,०३,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

शासनाचा महसूल बुडवून चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी वरठी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक १७२/२०२६ नुसार नोंद केला आहे.

सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहायक पोलीस निरीक्षक गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार खापडे व वरठी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली. या धडक कारवाईमुळे रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास वरठी पोलीस करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.