Home Latest News श्रीक्षेत्र खरडा येथे वारकरी सांप्रदायिक भव्य बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन

श्रीक्षेत्र खरडा येथे वारकरी सांप्रदायिक भव्य बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन

0
84

किशोर साहू, मौदा :- मागील 26 वर्षाप्रमाणे यंदा 27 व्या वर्षीही वैकुंठवासी गाथामूर्ती श्रीसंत बोधे बाबा यांच्या कृपा आशिर्वादाने श्रीक्षेत्र खरडा येथील हनुमान व नाथ मंदिर येथे वारकरी सांप्रदायिक भव्य बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन 26 एप्रिल ते 25 मे दरम्यान करण्यात आले.

शिबिरामध्ये प्रार्थना, योगासन, व्यसनमुक्ती, श्रीमद्भगवद्गीता, भजन, गायन, कीर्तन, टाळ वाजविणे, हरिपाठ, संत चरित्र या प्रशिक्षणार्थी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शक शिक्षकवृंद ह भ प अर्जुन महाराज गिरडकर, ह भ प माधव महाराज गिरडकर, ह भ प भीमसेन महाराज गिरडकर, ह भ प सिताराम महाराज तांबुलकर, ह भ प पांडुरंग महाराज तांबुलकर, ह भ प विजय महाराज महाजन, ह भ प नितेश महाराज ढोबळे, ह भ प प्रकाश महाराज सुखलकर, ह भ प प्रकाश महाराज येळणे, ह भ प कन्हैया महाराज गिरडकर, मंगेश महाराज वैद्य, नरेश ठवकर, ह भ प राधेश्याम महाराज गिरडकर, ह भ प धनंजय महाराज तांबुलकर ,ह भ प यश महाराज तांबुलकर, भ प विजय महाराज सेलोकर, ह भ प योगेश्वरानंद स्वामीजी हरिद्वार व त्यांचे सहकारी यांनी मार्गदर्शन केले.

या शिबिराला ह भ प पद्माकर महाराज तांबुलकर, ह भ प निंबाजी महाराज तागड (भारूडकार) ह भ प फटिंग महाराज ,ह भ प तानाजी गायधने,  विजय देशमुख (कन्हान), साध्वी यशोदा फटिंग, ह भ प प्रमोद हिवरे यांचे आशीर्वाद लाभले.

बोधे बाबांचे अखंड सहवासी ह भ प पितांबर महाराज शास्त्री (निष्काम सेवक), वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे प्रथम क्रमांकाने पास झालेले सद्गुरु जोग महाराज यांनी शिबिर संयोजक म्हणून भूमिका निभावली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक खरडा ग्रामवासीयांनी परिश्रम घेतले.