spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘त्या’ जप्त रेती साठ्यांचा लिलाव केव्हा?

– तहसील कार्यालयासमोर जमा रेतीमुळे नागरिक त्रस्त

– जप्त केलेल्या रेतीच्या साठ्याच्या लिलाव शक्यतो एका महिन्याच्या आत करावा 

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- तहसील कार्यालय रामटेक व पोलीस ठाण्याच्या समोर अवैध रेती वाहतुकी विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेली तब्बल ६०० ते ७०० ब्रासहून अधिक रेती सध्या तहसील कार्यालयासमोरील वाहन पार्किंग परिसरात साठविण्यात आली आहे. जप्त केलेल्या रेतीच्या साठ्याच्या लिलाव शक्यतो एका महिन्याच्या आत करावा. या प्रचंड रेतीच्या ढिगाऱ्यामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेती साठविल्यामुळे पोलीस वसाहतीकडे जाणारा रस्ता काही अंशी बंद झाला असून, वाहतूक अडथळाग्रस्त झाली आहे. तहसील कार्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी येतात; मात्र रेतीमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोयच उरलेली नाही. याशिवाय रस्त्यावर पसरलेली रेती घसरडी ठरत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. यापूर्वी ५ मार्च २०२५ रोजी न्यायालयाने ३५० ब्रास रेतीच्या लिलावास परवानगी दिली होती व त्यानंतर मे २०२५ मध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली होती. मात्र, त्यानंतरच्या सात महिन्यांत पोलीस कारवाईत पुन्हा मोठ्या प्रमाणावर अवैध रेती जप्त करण्यात आली असून, ती पुन्हा त्याच ठिकाणी साठविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘जप्त रेतीचा पुन्हा लिलाव कधी होणार?’ असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत. तहसील कार्यालयासमोरील चहा-नाश्त्याच्या टपऱ्या चालविणाऱ्या लघु व्यावसायिकांनाही या रेतीच्या ढिगाऱ्याचा फटका बसत असून, त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. प्रशासनाने त्वरित लिलाव प्रक्रिया राबवून रेती हटवावी, अशी मागणी ऐडवोकेट प्रफुल अंबादे शहित नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Popular Articles