spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मुख्यमंत्री फडणवीस यांचे थेट संबोधन ऐकून तांडावासीयांनी केला गाव समृद्ध करून पारितोषिक मिळविण्याचा निर्धार

– मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

किशोर साहू :मौदा, ता. १८: बुधवार ( दि. १७ सप्टेंबर )रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तांडा ग्रामपंचायत कार्यालय येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली.या सभेला गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने व राजकारण बाजूला ठेवून एकदिलाने सहभाग नोंदविला.गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, बचत गट, शेतकरी, भजन मंडळ, मंदिर समिती, तरुण मंडळी तसेच ग्रामपंचायत व विविध विभागांचे अधिकारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला. ग्रामसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट संबोधन ऐकून गावकरी प्रेरित झाले व त्यांनी तांडा समृद्ध करून पारितोषिक मिळवण्याच्या निर्धार व्यक्त केला.

ग्रामसभेला सरपंच विनोद गभने,उप सरपंच राजेंद्र खांदारे , ग्रामपंचायत सदस्यगण विलास डोरले ,शाम बांते ,अल्का पाठक,संगीता झिंगरे ,सौरभ झिंगरे, माजी उपसरपंच चंद्रशेखर जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष गंगाधर डोरले,जयराम डोरले,माजी सरपंच मेहमुद्दीन तुरक ,पोलीस पाटील पल्लवी गेडाम,सी आर पी स्वाती डोरले,ग्रामपंचायत अधिकारी संदीप रेहपाडे ,शीतल गभने,नंदा डोरले,वैशाली डोरले ,भागरता डोरले, सेवक वालदे तसेच तरुण मंडळी व इतर ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.