spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धनुष्यबाण कोणाचा? आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, उद्धव गटाची आक्रमक भूमिका  

 

नवी दिल्ली/मुंबई १४ : शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाला आज निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कडून निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना पक्षनाव एकनाथ शिंदे गटाला सोपवल्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज (सोमवार, १४ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

महापालिका निवडणुकांची पार्श्वभूमी पाहता, या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर आज पत्रकार परिषदेत संतप्त प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांचा सवाल – “आधार काय? पराभूत आमदारांवर निर्णय?”

“धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला दिलं, पण ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे,” असे राऊत म्हणाले. त्यांनी दावा केला की,
“निवडणूक आयोगाने पक्षाच्या स्थापनेचा, संघटनेचा विचार न करता, केवळ विधिमंडळातील संख्याबळाचा आधार घेतला. पण आज त्या गटातील बहुतेक आमदार व खासदार पराभूत झालेत. मग आयोगाचा आधार उरतो कुठे? त्यामुळे या निर्णयावर पुन्हा सुनावणी होऊन चिन्ह गोठवले जावे, ही आमची भूमिका आहे.”

राजकारणासोबत पावसावरही लक्ष

दरम्यान, आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचा अकरावा दिवस असून, विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीचा मुद्दा चर्चेत राहणार आहे. याशिवाय, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, हवामान खात्याकडून पुढील काही दिवसांसाठीही इशारे जारी करण्यात आले आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.