spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महिलेचा खून, सात महिन्यांचे बाळ विक्री; सात आरोपींना अटक

 

गोंदिया २५ : सडक-अर्जुनी तालुक्यातील खजरी शेत शिवारात सापडलेल्या महिलेच्या खून प्रकरणाचा गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. या प्रकरणात केवळ खूनच नव्हे, तर मृत महिलेच्या सात महिन्यांच्या बाळाची विक्री करण्याचा कट रचल्याचाही पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात सामील असलेल्या सात आरोपींना अटक केली आहे.

३ ऑगस्ट रोजी खजरी शेत शिवारात २० ते २५ वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळला होता. धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी इंद्रराज राऊत यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपासणी व गुप्त माहितीच्या आधारे मृत महिलेची ओळख अन्नू नरेश ठाकूर (वय २१, रा. भिलाई, दुर्ग, छत्तीसगड) अशी पटली. पुढील तपासात उघडकीस आले की मुख्य आरोपी अभिषेक सिद्धार्थ तूरकर (वय ३६, रा. भिलाई, ह.मु. डोंगरुटोला, गोरेगाव, जि. गोंदिया) याचे अन्नूसोबत अनैतिक संबंध होते.

कर्जबाजारीपणामुळे पैशांची तीव्र गरज भासल्याने अभिषेकने पत्नी पूनम तूरकर, नातेवाईक प्रिया तूरकर आणि साथीदार चांदणी यांच्यासह अन्नूची हत्या करण्याचा कट रचला. २ ऑगस्ट रोजी अभिषेकने अन्नुला खजरी शेत शिवारात नेऊन धारदार चाकूने तिचा खून केला.

या प्रकरणात गुन्हे शाखेने सात आरोपींना अटक करून बाळ विक्रीसंबंधीही तपास सुरू केला आहे. या भीषण प्रकरणामुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.