Home Latest News  डिलिव्हरी बॉयच्या बहाण्यावर महिलेला मंगळसूत्र चोरले

 डिलिव्हरी बॉयच्या बहाण्यावर महिलेला मंगळसूत्र चोरले

0
59

 

नागपुर १२ : अजनी पोलीस स्टेशन हद्दीत एका धक्कादायक चेन स्नॅचिंग घटनेचा प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने पार्सल देण्याच्या बहाण्यावर अश्विनी मेश्राम यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या गळ्यातील ३ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

घटनेवेळी अश्विनी मेश्राम घरात एकट्या होत्या. पार्सल घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने त्यांना कागदावर सही करण्यास सांगितले. अश्विनी सही करत असतानाच आरोपीने अचानक मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर अश्विनी आरडाओरड करताही आरोपी पळून गेला.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अजनी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.