– महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर केले मार्गदर्शन
गोंदिया :- गोंदियात 17 सप्टेंबर ला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .या मेळाव्याला महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित दशविली होती.
यावेळी रुपाली चाकणकर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांना मार्गदर्शन केले.त्यानंतर गोंदिया जिल्हाधिकारी कार्यलयात महिला आयोग आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी देखील रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या . महिलांच्या ५४ प्रकरणा पैकी ८ प्रकरण स्वतः समोरच मार्गी लावले. तर गोंदिया शहरातील जलराम लॉन या ठिकाणी आयोजित महिला मेळाव्यात गोंदिया जिल्याच्या आठही तालुक्यातील हजारो महिलांनी या मेळाव्यात हजेरी लावली होती या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्ष तसेच तालुका अध्यक्ष यांच्या शह कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येत उपस्थित होत्या यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी आमदार राजेंद्र जैन यांनी देखील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले
तर येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होऊ घातल्या त्यात आमच्या पक्षाच्या महिला देखील मोठ्या संख्येत निवडणू येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केल्या आहेत. या महिला मेळाव्याला राजेंद्र जैन यांची प्रमुख उपस्थिती होती तर रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पार्टीचे महिला सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




