spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शोभायात्रा मार्ग स्वच्छ व सुलभ करण्याचे कार्य प्रगतीपथावर

नागपूर :- शहरात विविध सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर निघणाऱ्या शोभायात्रांचा मार्ग भाविकांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि सुलभ राहावा यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे प्रगतीपथावर कार्य सुरू आहे. विशेषतः जुन्या भंडारा रोड परिसरात सुरू असलेल्या कामांची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कामाच्या गतीचा आढावा घेत आहेत.

काही दिवसांपूर्वी आमदार प्रवीण दटके आणि आयुक्त डॉ.विपीन यांनी शोभायात्रेच्या मार्गाची पाहणी करीत मार्गावर आवागमन सुलभ व्हावे, मार्गाची स्वच्छता सुनिश्चित करण्यात यावी असे निर्देशित केले होते त्यानुषंगाने विभागाद्वारे कार्य केले जात आहे. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी जुन्या भंडारा रोड परिसरात भेट देऊन स्वच्छता कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत कामे अधिक वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून भाविकांना कोणतीही अडचण न येता सहजपणे आवागमन करता यावे याकरिता अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्त्यांची स्वच्छता केली जात असून, शोभायात्रेच्या मार्गावरील कचरा, धूळ आणि अडथळे दूर करण्यात येत आहेत. याशिवाय, मार्गावरील स्वच्छता कायम राखण्यासाठी नियमित देखरेख ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Popular Articles