खापा :- पंचायत समिती सावनेर अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नागलवाडी येथे (दि.०४) ला जागतीक समता दिन साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने विविध उपक्रम घेण्यात आले. रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या उपक्रमात सत्तर विद्यार्थीनी सहभाग घेतला. विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. गट साधन केंद्राचे अपंग समावेषक विषय तज्ञ रविंद्र डाहाके, हिवसे, धवड मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते. यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी बॅन्ड पथक सह, रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तज्ञ मार्गदर्शकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांन विषयी मार्गदर्शन केले.

३ डिसेंबर ते ९ डिसेंबर पर्यंत या सप्ताहाचे आयोजन असून दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सरपंच दिपाली ठाकरे या होत्या, तर प्रमूख अतिथी म्हणुन पेंच व्याघ्र प्रकल्प नागलवाडी क्षेत्राचे वनपाल भोयर उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रशेखर टेकाम, मेघा टेकाम, किरण घूर्वे, विद्याथी संघाचे सदस्य राजू बांगडे आदिसह पालकांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रभू कारोकार यांनी तर आभार नंदकिशोर कदम यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम ने झाली.




