spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पीएम श्री जि प उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे जागतिक मृदा दिन साजरा 

किशोर साहू, मौदा, ता. ९:- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला .याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे उपस्थित होते. जागतिक मृदा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना सहाय्यक कृषी अधिकारी प्रगती धांडे यांनी विद्यार्थ्यांना जमिनीची कशी काळजी घ्यायची याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना मृदा दिनानिमित्त माहिती सांगितली . त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मुलांना आपल्या आई-वडिलांना शेतातील माती ची कशी काळजी घ्यायची याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती आपला आई-वडिलांना शेतीची प्रत आणि शेतीची कस कायम राखण्यासाठी जास्त प्रमाणात औषधीचा वापर टाळण्यात यावें असे सांगण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी प्रगती धांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना सहाय्यक कृषी अधिकारी यांनी जी माहिती सांगितली ती सर्व माहिती आपल्या आई-वडिलांना शाळेतील सर्व विद्यार्थी सांगतील असा विश्वास विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आला. आजच्या या जागतिक मृदादिन निमित्त शाळेतील शिक्षकवृंद लीलाधर काळबांडे , राजेश रोहाड, सुधीर खंडाईत, सुधीर कांबळे,संगीता आंबिलढुके कु.प्रज्ञा रामटेके ,सुजाता बोदेले उमेश उके,पुष्पलता उके ,कैलास फटिंग व समस्त विद्यार्थीगण उपस्थित होते. शिक्षक सुधीर कांबळे यांनी आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.