यवतमाळ :- शिवजयंती निमित्याने आयोजित राळेगाव येथील छत्रपती महोत्सवातील सांस्कृतिक स्पर्धेत प्रा. डॉ राम पंचभाई लिखित ,निर्मित आणि सहदिग्दर्शित एकांकिका ” शिवशिल्प” ने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती,राळेगाव आयोजित सांस्कृतिक स्पर्धेत अनेक नाटक,नृत्य नाटिकांचे प्रभावी सादरीकरण झाले. त्यात दमदार अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या यवतमाळच्या एकांकिका ” शिवशिल्प”ने प्रथम क्रमांक मिळवून,

“शिवशिल्प” या एकांकिकेचे दिग्दर्शन ऋषिकेश निवल यांनी केले.संगीत दिग्दर्शन मुनेश चव्हाण व ओम गायकवाड यांनी केले.प्रकाश संयोजन अशोक कार्लेकर तर नेपथ्य कुणाल मोरे यांनी केले. परीक्षक …प्रसिद्ध कवी,समीक्षक माधुरी आशीरगडे नागपूर, अपूर्वा सोनार व प्रा.अजय कोलारकर होते.




