spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हरदास नगर येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका 25 वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी चार दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव क्षितिज रहाटे रा हरदास नगर कामठी असे आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा घरात एकटाच असताना घरी कुणी नसल्याचे संधी साधून घराच्या वरच्या माळ्यावर जाऊन दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनेची माहिती मिळताच पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसानी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे तर मृत्यूचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.