spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भरधाव पिकअपच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना राखी तलाव परिसरातील नागरा तलावजवळ घडली. अपघातानंतर पसार झालेल्या पिकअपचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणय उमेश कोहपरे (वय २१, रा. बोंद्री, ता. मोहाडी, जि. भंडारा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रणय हा आईला सावनेरजवळील येरणगाव येथे सोडून रामटेकमार्गे आपल्या गावी जात होता. सायंकाळी सुमारे ६.१५ वाजताच्या सुमारास नागरा तलावाजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या पिकअप वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. प्रणय दुभाजकावर इतक्या जोराने आदळली की, त्याचे हेल्मेट तुटले. डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, पिकअप वाहनचालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला. त्याच मार्गाने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनचालकाने जखमी प्रणयला तातडीने रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पिकअप चालकाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पिकअप चालकाचा शोध घेत आहेत.

Popular Articles