कामठी :- कामठी-नागपूर मार्गावरील राज रॉयल लॉन येथे भारतीय जनता युवा मोर्चा (रामटेक) तर्फे महायुवा संमेलन व जिल्हा कार्यकारिणी पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविक भाषणात चंद्रशेखर बावनकुळे यांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी लोककल्याणकारी योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन केले. संघटन बळकट करण्यासोबतच समाजहिताच्या उपक्रमांमध्ये युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, खासदार अनिल बोंडे, आमदार राजीव पोतदार, माजी आमदार राजू पारवे, टेकचंद सावरकर, मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष चेतन खडसे, भाजप जिल्हा महामंत्री अजय बोढारे, अनिल निधान, रिंकेश चवरे, शुभांगीताई गायधने, राहुल किरपान, जिल्हा कोषाध्यक्ष अजय अग्रवाल, श्री श्री फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे, युवा मोर्चा महामंत्री मनोज गिरी, शिवराज माथुरकर, कुणाल भोस्कर, संकेत खतवार, सुनील जिवार, सुनंदाताई दिवटे, मंगेश यादव, चंद्रशेखर तुप्पट, कमलकिशोर यादव, रोहित पारवे, धर्मेंद्र शुक्ला, वीरेंद्र पायतोडे, उमेश कुंभलकर तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




