spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वाघाची खोटी अफवा पसरवणाऱ्या इसमास युवकांनी बदडले

किशोर साहू, मौदा, ता. १८ :- मौदा तालुक्यातील रहाडी परिसरात वाघाने ( बिबट्याने) चार जनावरांना ठार केल्याचे वृत्त पसरताच संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यातच सोशल मीडियावर वाघाच्या फोटोला एडिट करून खोटी पोस्ट टाकून, ती पोस्ट वायरल करून नागरिकांच्या भीतीत आणखी भर घालण्याच्या प्रकार काही असभ्य गृहस्थ करीत आहे. असाच प्रकार काल बुधवार ( दि. 17 डिसेंबर) ला गट ग्रामपंचायत नानादेवी अंतर्गत येणाऱ्या किरणापुर गावातील इसमाने केला. तो काल सायं 7 दरम्यान मांगली (चांदे) येथून किरणापुर येथे आपल्या गावाकडे दारू पिऊन दुचाकीने जात असताना रस्त्यात मध्यातच पडला. वाघाने पंजा मारला म्हणून मी पडलो अशा प्रकारचा संभाषण त्याने भ्रमणध्वनीवरून मांगली (चांदे) येथील युवकांसोबत केल्याने, याची शहनिशा करण्याकरिता युवक गेले असता त्यांना हा अफवा असल्याचा प्रकार आढळून आला. त्यामुळे युवकांनी त्या इसमास बदडले असल्याचे, आज गुरुवार (दि. 18 डिसेंबर) सकाळी सात वाजता वृत्तपत्र वितरित करीत असतानादरम्यान धान कापणीसाठी भंडारा जिल्ह्यातून आलेला मजूर युवराज बोरकर यांने सांगितले.

सध्या जिकडे तिकडे व संपूर्ण मौदा तालुक्यात शेतकऱ्यांचे शेती पीक धान, हिरवी मिरची ,कापूस ,भाजीपाला काढणे सुरू असून शेतकरी व शेतमजूर त्यांच्या कामात अत्यंत व्यस्त आहेत. त्यातच वाघ नसतानाही वाघाची खोटी अफवा काही असभ्य नागरिक पसरवत असल्याने शेतकरी व मजूर वर्ग भयभीत होऊन घरीच राहत असल्याने शेतमजुरांचे व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे हिवरा येथील एका शेतकऱ्याने आज सकाळी आठ वाजता दरम्यान वृत्तपत्र वितरित करीत असताना सांगितले.

गाव परिसरात व सोशल मीडियावर वाघ व बिबट्याची खोटी अफवा पसरविणाऱ्या असभ्य नागरिकांना संबंधित विभागाने कडक कारवाई करून शेतमजूर व शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्याच्याकडूनच वसूल करावी, अशी मागणी शेतमजूर ,शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Popular Articles