spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आर्णी येथे महारोजगार मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

यवतमाळ, दि. २५  : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल सेंटर व स्व.राजकमलजी भारती कला, वाणिज्य व  सुशीलाबाई आर भारती विज्ञान महाविद्यालय आर्णी आणि प्रेरणा बहूउद्देशीय सामाजिक संस्था, डोळंबवाडीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जिल्ह्यासह परिसरातील विविध तालुक्यांमधून 395 उमेदवारांनी मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. व्ही. वानखेडे, मार्गदर्शक म्हणून डॉ. गणेश सव्वालाखे व प्रमुख उपस्थिती म्हणून विस्तार अधिकारी गोविंद इंगोले, गट समन्वयक अधिकारी शारदा जाधव तसेच प्रेरणा बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विष्णू उकंडे उपस्थित होते. त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ. गणेश सव्वालाखे यांनी उमेदवारांना वेळेचे नियोजन जीवनात कसे करावे तसेच मुलाखतीसाठी तयारी कशी करावी याबाबत सविस्तर माहिती दिली. या करीयर व रोजगार मार्गदर्शन मेळाव्याकरिता सहायक आयुक्त प.भ.जाधव यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. विभागाच्या योजनांसह मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना मध्ये ऑनलाईन कसे रजिस्ट्रेशन करावे याबाबत दिनेश चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली.

यावेळी युवकांना महामंडळाच्या योजनाचे माहिती पत्रक देण्यात आले. महामंडळांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी वसंतराव नाईक महामंडळ, इतर मागासवर्गीय महामंडळ, दिव्यांग महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, आदिवासी विकास महामंडळ,  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, जिल्हा कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन केंद्र,  खादी ग्राम विकास महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली कोणत्या योजना राबवल्या जातात याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन प्रा. एम. एम. पांडे यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे डॉ. पी.एम. वानखडे यांनी मानले.

Popular Articles