spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

यवतमाळ, दि. २५ :  प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विमा काढण्यासाठी दि.३१ जुलैपर्यंत मुदतवाढ आहे. योजनेंतर्गत खरीप हंगामात विमा काढण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची जिल्ह्याकरीता निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी मुदतीत पिकविमा काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पिकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या बँक व सीएससी केंद्रावर जाऊन विमा काढावा. पिक विमा काढतांना सोयाबीन पिकासाठी १ हजार १६० प्रति हेक्टर, कपाशीसाठी ७५० प्रति हेक्टर, तूर पिकासाठी ४७० प्रति हेक्टर, ज्वारीसाठी ८२.५० प्रति हेक्टर, उडीद पिकासाठी ६२.५० प्रति हेक्टर आणि मूग पिकासाठी  ७० रुपये प्रति हेक्टरी भरुन विमा काढता येईल. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढून घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे

Popular Articles