spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. २५  : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीच्या योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

योजनांमध्ये भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रदाने, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती या योजनांचा समावेश आहे.

या शैक्षणिक वर्षातील योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज स्वीकृती दि. 1 जुलै पासून महाडीबीटी पोर्टलवर सुरु आहे. महाविद्यालयांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क मंजुरी, विद्यापीठाद्वारे मंजूर होणारे इतर शुल्क इत्यादी बाबीची मान्यता संबंधित सक्षम शैक्षणिक विभाग, शासकीय यंत्रणेकडुन करुन घेण्यात यावी व अर्ज सादर करावे.

भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी प्रदाने या योजनांचे अर्ज विद्यार्थ्यांनी एनपीसीआय बँक आधार लिंक करुन ऑनलाईन पध्दतीने विहीत कालावधीत परीपुर्ण भरलेला अर्ज सर्व कागदपत्रासह महाविद्यालयास सादर करावा. महाविद्यालयांनी नियमानुसार शिष्यवृत्तीस पात्र व परिपुर्ण मुळटीसीसह असलेले अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

Popular Articles