– अनिका पाहुणे ८९.१७ % प्रथम, राज चंद्रोल ८४.१७% व्दितीय तर खुशी शहा ७२.८३% तृतिय क्रमांक
कन्हान :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी – मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल ऑनलाईन जाहिर केला असुन यात धर्मराज कनिष्ट महाविद्यालय कांद्री- कन्हान चा १०० % निकाल लागला असुन अविका पाहुणे हिने ८९.१८ % गुण प्राप्त करून कनिष्ट महाविद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
धर्मराज कनिष्ट महाविद्यालय कांद्री-कन्हान येथे विज्ञान शाखेतुन एकुण ८० विद्यार्थ्यानी इयत्ता बारावीची परिक्षा दिली असुन ८० ही विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या कनिष्ट महाविद्यालयाचा १०० % निकाल लागला आहे. यात डिस्टीक्शन – ०२, ग्रेड १ – २८, ग्रेड २ – ५० असे एकुण ८० विद्यार्थी उत्तिर्ण झाले असुन कु. अविका संतोष पाहुणे हिने ८९.१७ % गुण प्राप्त करून धर्मराज कनिष्ट महाविद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राज मिथलेश चंद्रोल याला ८४.१७ % गुण प्राप्त करून व्दितीय तर कु. खुशी मनोज शहा हिला ७२.८३% गुण मिळवुन तिसरा क्रमांक पटकाविला आहे. धर्मराज कनिष्ट महाविद्यालय कांद्री-कन्हान ने इयत्ता १२ वी च्या परिक्षेत १०० % निकालाची प्रथा कायम केल्याने शाळेचे संचालक खुशाल पाहुणे यानी प्राचार्य, सर्व विषय शिक्षकांचे तसेच सर्व उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.