spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एनपीटीईएल अभ्यासक्रमात शंभर टक्के निकालाची नोंद

– चार प्राध्यापकांना सुवर्ण तर दोन प्राध्यापकांना रौप्य प्रमाणपत्र

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- कविकुलगुरू इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एंड सायंस (किट्स) येथील यांत्रिकी विभागातील नऊ प्राध्यापकांनी एनपीटीईएल व एआयसीटीई तर्फे आयोजित “मानांकन आणि परिणामाधारित शिक्षण” हा आठ आठवड्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम ऑगस्ट -ऑक्टोबर २०२५ मधे यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. विभागाने या अभ्यासक्रमात शंभर टक्के निकालाची नोंद केली आहे. या अभ्यासक्रमात प्रा. विजय आटे ( ९७ टक्के), डॉ. प्रशांत परहाड (९६ टक्के), प्रा. योगेश सुपले (९४ टक्के) व प्रमोद पोकळे (९१ टक्के) यांनी सुवर्ण प्रमाणपत्र तर डॉ. सतीश भेले (८७ टक्के) आणि डॉ. संजय बोरिकर (८१ टक्के) यांनी रौप्य प्रमाणपत्र मिळविले. डॉ. महेश मावळे, डॉ. श्रीकृष्ण चिंचोळकर आणि प्रा. आनंद रहाटे यांनीही परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. हा अभ्यासक्रम भारतीय तंत्रज्ञान संस्था, आयआयटी खडगपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या माध्यमातून प्राध्यापकांना मानांकन व परिणामाधारित शिक्षण यांचे सखोल ज्ञान प्राप्त झाले आहे. संस्थेचे सचिव वी. श्रीनिवास राव, प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे आणि विभागप्रमुख डॉ. यशवंत जीभकाटे यांनी सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले. या यशामुळे किट्स संस्थेला होणाऱ्या एनबीए मानांकन प्रक्रियेस नक्कीच बळकटी मिळेल, असे मत व्यक्त केले.

Popular Articles