spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मतदार जनजागृती अभियान अंतर्गत ‘ स्वीप ‘ कार्यक्रमाचे आयोजन

– महिला बचत गटांना दिले मतदार जनजागृतीचे धडे

– नगर परिषद प्रशासनाचा उपक्रम

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता मतदार जनजागृती अभियान अंतर्गत ‘ स्वीप ‘ कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषद रामटेक यांच्या वतीने बुधवार (दि.१२) नोव्हेंबर रोजी महिला बचतगटांच्या सभासद महिलांसाठी मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन नगरपरिषद रामटेक येथील सभागृहात करण्यात आले होते. सदर कार्यक्रम हा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्दिष्ट महिलांना मतदानाचे महत्त्व समजावून देणे, तसेच मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांची माहिती देणे हे होते. या कार्यक्रमामध्ये महिलांना मतदान हा केवळ अधिकार नसून लोकशाहीतील आपले कर्तव्य असल्याचे सांगण्यात आले. तसेच मतदान प्रक्रिया सुलभ आणि सर्वसमावेशक करण्याकरिता मतदान केंद्रावरील सोयी सुविधा जसे पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्प, आणि सहायक सुविधा तसेच जेष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दिव्यांगांसाठी प्राधान्य रांगा इत्यादी सुविधा यांचा उल्लेख करून माहिती देण्यात आली. महिला बचत गटातील सदस्यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी महिलांनी समाजात मतदानाबाबत जागृती निर्माण करून इतर नागरिकांनाही दि.०२ डिसेंबर रोजी मतदानासाठी प्रोत्साहित करावे, जेणेकरून अधिकाधिक लोक मतदानात सहभाग घेऊ शकतील, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संयोजन नगरपरिषद रामटेक तर्फे करण्यात आले होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.