spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या विनापरवाना दारू काढणारे, दारू बाळगुण विकी करणारे तसेच सेवन करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध १२ गुन्हे नोंद

नागपुर :- दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू बाळगुन विक्री करणाऱ्यांवर छापा टाकुन देशी दारू, मोहाफुल दारू असा एकुण ११,७००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस स्टेशन भिवापूर येथे एकुण १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन रामटेक येथे एकुण ०४ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन केळवद येथे एकुण ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन खापा येथे एकुण ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथे ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन बेला येथे एकुण ०४ गुन्हे नोंद आहे. महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अन्वये एकुण १२ गुन्हे नोंद केले आहे.

सदर कारवाईत ७२०० मिली देशी दारु, ८५ लीटर मोहाफुल दारू असा एकुण ११७००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशवंत मुद्देमाल पंचनामा कारवाई करून नष्ट करण्यात आला आहे.

Popular Articles