नागपूर, १० : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. (ता.09) बुधवार रोजी शोध पथकाने 15 प्रकरणांची नोंद करून 70,300/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 1,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 100/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 12,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 03 प्रकरणांची नोंद करून 600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 04 प्रकरणांची नोंद करून रु. 4,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे.हरित लवाद यांनी दिलेल्या दि.03.07.2017च्या अंतर्गत आदेशाप्रमाणे व दिलेल्या र्निदेशाप्रमाणे करण्यात आलेल्या कारवाई अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करून रू.50,000/- चे दंड वसुल करण्यात आले. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत प्रियदर्शन हांडे यांनी चेंबर तोडल्यामुळे रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे.हायवे ग्लोरी रेस्टॉरेंट यांनी चेंबर मध्ये रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे रू.50,000/- चे दंड वसुल करण्यात आले.तसेच मे.लक्ष्मी कंस्ट्रकशन यांनी बांधकामाचे साहित्य टाकल्याने चेंबर बुजल्यामुळे रु. 5,000/- चे दंड वसूल करण्यात आले.धंतोली झोन अंतर्गत मे. आकाश फुटाणा भंडार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. चेतेश्वर किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसूल करण्यात आले. सतजरंजीपुरा झोन अंतर्गत मे. अमोल किराणा शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने 06 प्रकरणांची नोंद करून रू. 75,000/- दंड वसूल केला.





