spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

16015 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

कामठी :- न्यायालयीन अपील दाखल झालेल्या कामठी नगर परिषदमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून कामठी नगर परिषदेतील उर्वरित प्रभाग क्र 10 अ,11 ब तसेच 17 ब च्या तीन जागेसाठी 20 डिसेंबर ला मतदान होणार आहे.ज्यामध्ये तिन्ही प्रभागातील मतदार संख्येनुसार एकूण 16 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावनार आहेत ज्यामध्ये 7871 पुरुष 8143 स्त्री व एक तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे.

20 डीसेंबर ला होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद सर्वत्रिक निवडणूकितील प्रभाग क्र 10 अ मध्ये एकुण 5594 मतदार असून पुरुष मतदार 2821 व स्त्री मतदार 2773 आहेत,प्रभाग क्र 11 ब मध्ये एकूण 4720 मतदार असून 2326 पुरुष मतदार,2393 स्त्री मतदार व एक तृतीयपंथी मतदार आहे.प्रभाग क्र 17 ब मध्ये एकूण 5701 मतदार असून 2724 पुरुष मतदार,2977 स्त्री मतदार चा समावेश आहे.हे सर्व मतदार 20 डीसेंबर रोजी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाची वेळ सकाळी 7.30ते सायंकाळी 5.30पर्यंत आहे.सर्व एकत्रित मतमोजणी रविवार दिनांक 21 डीसेंबर 2025 रोजी रविदास नगर जवळील शासकीय आय टी आय सभागृहात होणार आहे.मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.लोकशाही बळकट करण्यासाठी तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी या निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा असे आवाहन कामठी नगर परिषद प्रशासनाकडून निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विनोद जाधव यांनी केले आहे.

Popular Articles