कामठी :- कामठी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 18 डिसेंबर ला मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्र अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना ईव्हीएम हाताळनीचे प्रशिक्षण देण्यात आले.प्रशिक्षण वर्गात ब्यालेट युनिट,कंट्रोल युनिट,कंट्रोल युनिटशी जोडणे,प्रात्यक्षिक मतदानाची नोंद तपासण्याचे प्रशिक्षण इत्यादी विविध बाबीवर प्रशिक्षण देण्यात आले. तसेच संभाव्य चुका याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या मुख्य उपस्थितीत शासकीय आय टी आय सभागृहात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणास एकूण 136 कर्माचारी उपस्थित होते ज्यामध्ये 63 पुरुष व 74 महिला कर्मचारीचा समावेश आहे.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विनोद जाधव,नायब तहसीलदार मयूर चौधरी ,आदी उपस्थित होते.








