spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अवैध वाळू साठा प्रकरणी २.३८ कोटींचा दंड

– ३२८३ ब्रास अतिरिक्त साठा; आर्णी तहसीलदारांचा आदेश पारित

–  जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी दिली माहिती

यवतमाळ :- आर्णी तालुक्यातील जलांद्री भागातील अवैध वाळू साठा प्रकरणात महसूल प्रशासनाने मोठी कारवाई करत २ कोटी ३८ लाख ४१ हजार ८४० रुपयांचा दंड आकारला आहे. याबाबत आर्णीचे तहसीलदार यांनी आदेश पारित केल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी दिली.

या आदेशानुसारनुसार, गैरअर्जदार यांनी आर्णी तालुक्यातील मौजा जलांद्री १ व घाटंजी तालुक्यातील मौजा माणुसधरी येथील मंजूर वाळूघाटातून उत्खनन केलेली वाळू ही मौजा जलांद्री (आयता हद्द) येथील गट क्रमांक ३२ मधील साठवणुकीसाठी मंजूर १.१९ हेक्टर क्षेत्रामध्ये साठविण्यात आली होती.

या ठिकाणी मंजूर साठ्यापेक्षा ३२८३.७७ ब्रास अतिरिक्त वाळू साठा आढळून आल्यामुळे या प्रकरणात गैरअर्जदाराला एकूण २ कोटी ३८ लाख ४१ हजार ८४० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, या दंडात्मक कारवाईतून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.