spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हानमध्ये अवैध जुगारप्रकरणी २ गुन्हे; ३२,६०० रु. जप्त

कन्हान :- कन्हान पोलीसांना अवैध जुगाराबाबत मिळालेल्या माहीतीच्या आधारे, मौजा एम जी नगर आणि मौजा सत्रापुर परिसरात अवैधरित्या ५२ ताशपत्त्याचा जुगार खेळणाऱ्या आरोपीतांवर दोन ठिकाणी छापा टाकुन ५२ ताशपत्ते व रोख रक्क्म असा एकुण ३२,६००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कारवाई कं १ मौजा एम. जी. नगर परिसरात आरोपी १) सिध्दार्थ मोरेश्वर गायकवाड, वय २३ वर्ष, २) आशिक ज्ञानेश्वर गायकवाड, वय १८ वर्ष ३) विकास अनिल गायकवाड, वय १९ वर्ष ४) शुभम मोरेश्वर गायकवाड, वय २० वर्ष, सर्व रा. तारसा रोड, कुसाजी नगर, कन्हान ता. पारशिवनी हे अवैधरित्या ५२ ताशपत्त्याचा जुगार खेळतांना मिळुन आले. नमुद आरोपीतांच्या ताब्यातुन १) नगदी १०१०/- रूपये, ५२ तासपत्ते व दोन मोबाईल किंमती १८०००/- रूपये, तसेच इतर साहित्य असा एकुण किंमती २०,०६०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाई के २ : मौजा सत्रापुर कन्हान परिसरात आरोपी १) रामु गयाप्रसाद यादव, वय ६३ वर्ष, रा. जुना पोलिस स्टेशन समोर, गवळीपुरा कन्हान २) रमेश लल्ला महतो, वय ६३ वर्ष, रा. पिपरी कन्हान ३) राजन भिसे, रा. सत्रापुर, कन्हान ता. पारशिवनी हे अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळतांना मिळुन आले. नमुद आरोपीतांच्या ताब्यातुन नगदी ४,४९०/- रूपये, ५२ तासपत्ते व एक मोबाईल किंमती ८०००/- रूपये असा एकुण १२,५४०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दोन्ही कारवाईत ५२ ताशपत्ते व नगदी ५५००/- रूपये ३ मोबाईल आणि इतर साहीत्य असा एकुण ३२,६००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. वर नमुद आरोपीतांवर महाराष्ट्र जुगार कायदयान्वये ०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Popular Articles