spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

२४ तासांत शेतातील चोरीचे २ गुन्हे उघड; ६ आरोपी अटक, २०.५० हजारांचा मुद्देमाल जप्त

अरोली :- पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत दिनांक १५/०१/२०२६ रोजी शेतातील चोरी चे दोन गुन्हे दाखल आहे. १) फिर्यादी प्रमोद मुलचंद बरबटे, वय ४९ वर्ष, रा. निमखेडा, ता. मौदा, जि. नागपुर यांनी तक्रार दिली की, निमखेडा शिवारातील त्यांचे शेतातुन दिनांक १०/०१/२०२६ रोजी ३ धानाचे पोते आणि ट्रक्टर मधील जुनी वापरती बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केले अशा फिर्यादीच्या रीपोर्ट वरून पोलीस स्टेशन अरोली येथे कलम ३०३(३), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद आहे. तसेच २) फिर्यादी नामे रामय्या सामय्या मुदन्ना, वय ६१ वर्षे, रा. प्लॉट न. ००३ तिम्मा समुद्रम्म, ता. नागुउपलपाड्डु जि. प्रकाशम (आध्रप्रदेश) ह. मु. झुल्लर ता. मौदा जि. नागपुर यांनी तकार दिली की, मौजा अडेगांव शिवारातील त्यांचे शेतात दिनांक १४/०१/२०२६ रोजी ४ बोरे कापुस अंदाजे १ क्विटल काढला होता. कापुस नेण्यासाठी साधन नसल्याने कापुस शेतालगत असलेल्या कॅनल जवळ ठेवला होता. अज्ञात चोरटयांनी फिर्यादीने ठेवलेला अंदाजे १ क्विंटल कापुस चोरी केला. अशा फिर्यादीच्या रीपोर्ट वरून पोलीस स्टेशन अरोली येथे कलम ३०३(३), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद केला होता.

हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात अरोली पोलीसांनी वर नमुद दोन्ही गुन्हयात कसुन तपास करून गुप्तबातमीदारांच्या माहीतीच्या आणि तांत्रिक पुराव्यांच्या अधारे दिनांक १५/०१/२०२६ रोजी धान चोरीच्या गुन्हयात आरोपी नामे १) अमित अर्जुन पटिये, वय ३१ वर्ष रा निमखेड़ा २) सोनू उमाशंकर बिसेन, वय ३२ वर्ष, ३) रोहित रामू मूर्खे, वय २६ वर्ष, ४) रितिक रामू मूर्खे, वय २३ वर्ष, ५) नाशिक गौरीशंकर मानकर, वय २७ वर्ष सर्व रा. आदिवासीनगर, नीमखेड़ा यांना ताब्यात घेवुन नमुद आरोपीकडे सखोल आणि कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याबाबत कबुली दिली. पोलीसांनी नमुद आरोपींकडुन गुन्हयात चोरीस गेलेले ३ धानाचे पोते किंमती ६५००/- रुपये, ट्रॅक्टर बॅटरी किंमती ७,०००/- रुपये असा एकूण १३,५००/-रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कापुस चोरीच्या गुन्हयात आरोपी नामे पवन मधुकर वरठी, वय २३ वर्ष, रा. घोरपड, ता. मोहाडी, जि भंडारा यास ताब्यात घेवुन नमुद आरोपीकडे सखोल आणि कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याबाबत कबुली दिली. पोलीसांनी नमुद आरोपीकडुन गुन्हयात चोरीस गेलाला मुद्देमाल १ क्विंटल कापूस किंमती ७,०००/- रुपये जप्त केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अरोली पोलीसांनी नमुद दोन्ही गुन्हे दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तसात उघडकीस आणुन चोरी गेलेला संपुर्ण मुद्देमाल किंमती २०,५०० /- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.