spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

डोंगर यावली येथे मंजूर असलेल्या ३३/११ केव्ही उपकेंद्राची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा ! 

वीजेची समस्या सोडविण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या ! 
मोर्शी 30 :- हिवरखेड येथे असलेल्या वीज वितरण केंद्रामधून परिसरातील संपूर्ण शेतकऱ्यांना दिवसा वीज सुरळीत वीज पुरवठा करण्याची क्षमता नसल्यामुळे हिवरखेड, दापोरी, डोंगर यावली, घोडदेव, सालबर्डी, बोपलवाडी इस्माइलपुर परिसरामध्ये विजेअभावी संत्रा बागांची व शेतीमालाची होरपळ होत आहे.  मोर्शी तालुक्यातील हिवरखेड दापोरी डोंगर यावली घोडदेव सालबर्डी परिसरातील शेतकऱ्यांच्या वीजेच्या समस्या सोडविण्यासाठी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी डोंगर यावली येथे नवीन ३३/११ के.व्ही. उपकेंद्राकरिता २०८.४०१ लक्ष रूपये निधी मंजूर केलेला असतांना सुद्धा सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नसल्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त असतांना ‘महावितरण’चे अधिकारी शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळत आहेत. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता त्यांना शेतीपंपासाठी दिवसा किमान आठ तास सुरळीत वीजपुरवठा करा; अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा ईशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना दिला.
  मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून हिवरखेड महसूल मंडळामध्ये हजारो हेक्टर क्षेत्रावर संत्रा पिक घेतल्या जाते वाढत्या तापमानात संत्रा पिकांना नियमित पाणी द्यावे लागते मात्र सातत्याने वीजपुरवठा खंडित होणे, शॉर्टसर्किट होणे, कमी दाबाने वीज पुरवठा होणे, देखभाल दुरुस्तीची कामे वेळेवर न होणे यासह आदी कारणांमुळे शेतकऱ्यांना पिकाना पाणी देता येत नाही.
     मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून विजेच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन ‘महावितरण’चे मुख्य अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा होण्यासाठी कार्यकारी अभियंता यांनी मोर्शी तालुक्यातील विजेच्या समस्या दूर करण्यासाठी कृषी आकस्मिक निधी, सुधारित वितरण क्षेत्र, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम व सामान्य सुधारणा विकास प्रणाली अशा विविध योजनांतर्गत फीडर विलगीकरण, नवीन उपकेंद्र प्रस्तावित करणे, ट्रान्सफॉर्मर बदलणे, ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविणे, दुरुस्ती करणे, विविध उपकेंद्रांची दुरुस्ती करणे व जोडवाहिनी टाकणे, सिंगल फेज अशी कामे प्रस्तावित करून मंजूर असलेल्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून मंजूर कामे तत्काळ सुरू करावीत. अनेक कामे अद्याप पूर्ण न झाल्याने तालुक्यातील ग्राहकांना विजेच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, तसेच हिवरखेड, दापोरी, डोंगर यावली, घोडदेव, सालबर्डी परिसरात विजेचा प्रश्न गंभीर असून येथील शेतकऱ्यांचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यात यावा, अशी मागणी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन मंजूर असलेल्या उपकेंद्राची टेंडर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून डोंगर यावली येथे मंजूर असलेले ३३/११ केव्ही उपकेंद्राचे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्याकडे करण्यात आली यावेळी शेतकरी संजय पांडव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंकुश घारड, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, दिनेश घोरमाडे, पंकज ठोके, नितीन काळे, शेखर गांजरे, मनोहर राऊत, राजेश म्हस्के, शुभम तिडके यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.