spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भारतीय संविधानाच्या अपमान करणाऱ्यावर देशद्रोहाच्या व अट्रासिटी ॲक्ट नुसार गून्हा दखल करण्याची मागणी.

आंबेडकर अनुयायीनीं व विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी कन्हान पोलिस ठाण्यात लेखी तक्रार
कन्हान 30 : भारतीय संविधानाच्या अपमान करणाऱ्यावर देशद्रोहाच्या व अट्रासिटी ॲक्ट नुसार गून्हा दखल करण्याची मागणी आंबेडकर अनुयायीनीं व विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी
कन्हान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना गुन्हा दाखल करण्यास लेखी तक्रार देऊन तत्काळ प्रभावाने मागणी केली.
बुधवार (दि.25) जून रोजी कन्हान शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने कन्हान येथील तारसा रोड दिवटे भवन येथे संविधान विरोध दिवस कार्यक्रम केला. आणि कार्यक्रमांची  बातमी वृत्त प्रत्रात प्रकाशित करण्यात आली. त्या बातमी मध्ये छापलेल्या मचकुरामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवले आहेत. अंतकरणास  ठेस पोचली आहे.अश्या बातमी प्रकाशित करून समाजात – समाजात तेळ निर्माण करण्यावर प्रकाशित झालेल्या वृत्त प्रत्रात बातमीत ज्यांचे नावे तसेच छायाचित्रात दिसणारे व्यक्तीवर देशद्रोहाच्या व अट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यातबाबत. लेखी तक्रार अर्ज देऊन तत्काळ प्रभावाने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा आंदोलनाची चेतावणी देण्यांत आली. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कन्हान, पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र, पोलीस महासंचालक मुंबई,अनुसूचित जाति आयोग, मुंबई, राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग,दिल्ली, गृहराज्य मंत्री महाराष्ट्र राज्य,  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रधानमंत्री भारतसरकार, उच्चतम न्यायालय, सरन्यायाधीश दिल्ली यांना प्रतीलीपी पाठवण्यात आली.
यावेळी भदंत के.सी.एस.लामा, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भिमटे, योगेश रंगारी,नितिन मेश्राम, राजेश फुलझेले,रॉबिन निकोसे, गौरव माहोरे, महेश धोंगडे, केतन भिवगडे, चिराल वैद्य,अश्वमेघ पाटिल,अजय चव्हाण सह आंबेडकर अनुयायीनीं व विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने उपस्थित होते.

Popular Articles