spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपाच्या ‘स्वच्छ मोहल्ला स्पर्धेत’ शहरातील ३६८ मोहल्यांचा सहभाग

– विजेत्यांना मिळणार तब्बल १ कोटी ६० लाखांचा विकास निधी

नागपूर :- स्वच्छ, सुंदर, व हरित नागपूर साकारताना शहरातील रहिवासी परिसरांना स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेने अधिक स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मनपाद्वारे आयोजित स्वच्छ मोहल्ला स्पर्धेत शहरातील दहाही झोन मधील ३६८ मोहल्यांनी सहभागी झाले आहे. आता पुढच्या आडवड्यापासून स्पर्धेत भाग घेणाऱ्या मोहल्यांचे सर्वेक्षण अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्था, नागपूर मार्फत करण्यात येणार आहे.

नागपूर महानगरपालिकेने या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवली असून, विजेत्या मोहल्ल्यांना परितोषिकाची रक्कम केवळ पारितोषिक म्हणून न देता, विकास निधी म्हणून दिली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या मोहल्ल्यांना विकासकामांसाठी तब्बल १ कोटी ६० लाखांचा बक्षीस निधी दिला जाणार आहे. प्रथम क्रमांकासाठी ३ मोहल्ले निवडले जाणार असून, प्रत्येकी रु. २५ लाख पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच द्वितीय क्रमांकासाठी ५ मोहल्ले निवडले जाणार असून, प्रत्येकी रु. १० लाख पुरस्कार देण्यात येईल. तृतीय क्रमांक साठी ७ मोहल्ले निवडले जाणार असून, प्रत्येकी रु. ५ लाख पुरस्कार देण्यात येतील.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी मोहल्ल्याची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यात ज्या मोहल्ल्यांमध्ये २०० ते ५०० घरे आहेत त्यांनी याचात भाग घेतला आहे.

मोहल्ल्यातील स्वच्छतेचे मोजमाप करताना केवळ कचरा व्यवस्थापनच नव्हे, तर सामाजिक सहभाग आणि नागरिक कर्तव्ये यावरही भर दिला जाईल. घराघरांतून ओला, सुखा आणि धोकादायक कचरा १०० टक्के वेगळा करणे. तसेच ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणे, सिंगल-यूज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आणि आरआरआर (Reduce, Reuse, Recycle) तत्त्वाचा प्रभावी वापर. मोहल्ल्यातील बाग, सार्वजनिक स्थळे, पार्किंग, स्वच्छता व योग्य देखभाल करणे, रस्त्यावरच्या विक्रेत्यांना व दुकानदारांना कचरापेट्या उपलब्ध करणे, ‘ब्लॅक स्पॉट्स’ (कचरा टाकण्याची ठिकाणे) हटविणे व त्यावर देखरेख ठेवणे, तसेच ‘रेड स्पॉट’ (थुंकी) नियंत्रण व निर्मूलन करणे, नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये स्वच्छता जनजागृती करणे आणि कचरा व्यवस्थापनातील नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणे, बांधकामावरील ढिगाऱ्याचे व्यवस्थापन आणि रस्त्यांची स्वच्छता, आदीचे विविध निकषांवर अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्था, नागपूरच्या मार्फत मूल्यांकन केले जाणार आहे.

स्पर्धेत झोन निहाय भाग घेणाऱ्या मोहल्याची यादी या प्रकारे आहे.

लक्ष्मीनगर झोन- ४४

धरमपेठ झोन- ४८

हनुमाननगर झोन- ५६

धंतोली झोन -३६

नेहरूनगर झोन- ३४

गांधीबाग झोन- ३१

सतरंजीपुरा झोन- २४

लकडगंज झोन -३४

आशिनगर झोन -३१

मंगळवारी झोन- ३०

Popular Articles