यवतमाळ :- भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पं. नेहरु यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी अनिरूद्ध बक्षी यांनी, तसेच सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी पुष्प वाहून अभिवादन केले.








