spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ड्रंक अँड ड्राईव्ह च्या ३९० कारवाई, १० लाख ४८ हजारांचा दंड आकरण्यात आला

– अवैध दारू चे १५७ गुन्हे नोंदविले. १८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

नागपुर :- नाताळ सणानिमित्य तसेच नववर्षा निमित्य शासनाने दिनांक २४/१२/२०२५, दिनांक २५/१२/२०२५ व दि. ३१/१२/२०२५ रोजी रेस्टॉरन्ट व इतर मनोरंजनात्मक आस्थापना यांना रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवण्यास दिलेली मुभा पाहता ड्रंक अॅन्ड ड्राईव्हमुळे होणाऱ्या अपघाताला आळा बसण्याकरीता हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण जिल्हयात दिनांक २४/१२/२०२५ ते दिनांक ३१/१२/२०२५ रोजीपर्यंत ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह, अवैध दारू तसेच इतर अवैध धंदयावर कारवाई कामी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. सदर विशेष मोहीमे अंतर्गत दिनांक २४/१२/२०२५ ते दिनांक ३१/१२/२०२५ रोजी पर्यंत मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह च्या एकुण ३९० कारवाई, तसेच विना हेल्मेट, विना परवाना, ओव्हर स्पीडच्या आणि इतर १५९८ कारवाई अशा एकुण १९७५ कारवाई करून एकुण १०,४८,६०० /- रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे सदर विशेष मोहीमे अंतर्गत दिनांक २४/१२/२०२५ ते दिनांक ३१/१२/२०२५ रोजी अवैध दारू विक्रेते, दारू काढणारे सेवन, तसेच वाहतुक कारणाऱ्यांवर कारवाई करत महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अन्वये विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एकुण १५७ गुन्हे नोंद करण्यात आले असुन सदर कारवाईत देशी दारु, विदेशी दारू, मोहाफुल दारू वाहने असा एकुण १८,९०,७८७/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.