spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खुन करणाऱ्या आरोपीला तात्काळ केले अटक

काटोल :- फिर्यादी नामे निलेश किसना काळे, वय ४० वर्ष, रा. येनवा ता. काटोल, यांनी पोलीस स्टेशन काटोल येथे तोंडी रिपोर्ट दिली की, ३१/१२/२५ चे २१.३० वा ते २२.०० वा दरम्यान मौजा येनवा येथे फिर्यादी यांचा फिर्यादीचा मोठा भाऊ आरोपी राजेश किसना काळे, वय ४२ वर्ष रा. येनवा, ता. काटोल व फिर्यादी चा लहान भाऊ मृतक हरिष किसना राउत वय ३२ वर्ष रा. येनवा ता. काटोल यांच्या मध्ये पैशाच्या कारणावरून वादविवाद झाल्याने फिर्यादीचा मोठा भाऊ राजेश याने फिर्यादीचा लहान भाऊ हरिष याला विटाने मारहान करून जिवानाशी ठार केले. अशा रिपोर्ट वरून कलम १०३(१) भा.न्या.सं. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा केल्यानंतर नमुद आरोपी हा घटनास्थळावरून पळुन गेला. अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. तसेच तपास पथकाला महत्वाच्या सुचाना दिल्या. हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा, अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि पराग पोटे, उपविभागिय पोलीस अधिकारी, काटोल यांच्या मार्गदर्शनात काटोल पोलीसांनी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे अवघ्या ३ तसात नमुद आरोपी नामे राजेश किसना काळे, वय ४२ वर्ष, रा. येनवा, ता. काटोल याला येनवा जंगल परीसरातुन ताब्यात घेतले. आरोपीला दिनांक ०१/०१/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. नमुद आरोपीचा दिनांक ०२/०१/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.