– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. रविवार ते शनिवार (ता.26 जुलै ते 01ऑगस्ट) शोध पथकाने 425 प्रकरणांची नोंद करून 2,46,500 रुपयाचा दंड वसूल केला.सार्वजनिक ठिकाणी , रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून २०० रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे या अंतर्गत 7 प्रकरणाची नोंद करून 3,500 रूपयाची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 242 प्रकरणांची नोंद करून 96,800 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 16 प्रकरणाची नोंद करून रू.1,600 रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 23 प्रकरणाची नोंद करून 9,200 रूपयाची वसुली करण्यात आली. शैक्षणिक संस्था,कोचिंग क्लासेस अशा संस्थांनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 वसूली करण्यात आली.
मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 13 प्रकरणाची नोंद करून 26,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ , मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे. या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी वाहने/ जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1000 वसूली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी त्यांचा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 3,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वैदयकिय व्यवसायिकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचरयात टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 25,000 वसूली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 16 प्रकरणाची नोंद करून 16,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 12,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 7 प्रकरणाची नोंद करून रू.30,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 91 प्रकरणांची नोंद करून 18,200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे 3 प्रकरणाची नोंद करून रू15,000 दंड वसुल करण्यात आले.सामान्य कचऱ्यात बायोमेडिकल वेस्ट आढळल्यामुळे 2 प्रकरणांची नोंद करून रू.50,000 चे दंड वसुल करण्यात आले. प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल17 प्रकरणाची नोंद करून रू.90,000 चे दंड वसुल करण्यात आले. रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य साठवल्यामुळे12 प्रकरणांची नोंद करून रू.1,20,000 चे दंड वसुल करण्यात आले. रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे 3 प्रकरणाची नोंद करून रू.20,000 दंड वसुल करण्यात आले. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 17 प्रकरणाची नोंद करून 85,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 54 प्रकरणांची नोंद करून रू.3,80,000 दंड वसुल केला.





