– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ७९ मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. गुरुवार (ता. २९) शोध पथकाने ४३ प्रकरणांची नोंद करून ३४१०० रुपयाचा दंड वसूल केला.
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता करणे (रु. ४०० दंड) या अंतर्गत २० प्रकरणांची नोंद करून ८००० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. १०० दंड) या अंतर्गत २ प्रकरणाची नोंद करून २०० रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. ४०० दंड) या अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून ४०० रूपयांची वसुली करण्यात आली.
मॉल, उपहारगृहे, लाँजिग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत २ प्रकरणांची नोंद करून ४००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १६ प्रकरणांची नोंद करून १९५०० रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून १००० रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून १००० रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास १६ प्रकरणांची नोंद करून ३२०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत बॉम्बे दवाई शॉप यांच्यावर रस्त्यालगत अस्वच्छता पसरविल्या प्रकरणी रु. ५,००० चे दंड वसुल करण्यात आले. नेहरू नगर झोन अंतर्गत सुमित बार एन्ड रेस्टोरंट यांच्यावर रस्त्यालगत कचर पसरविल्यासह कचऱ्याची पोचपावती नसल्या प्रकरणी रू.५००० चे दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. गोविंद किराणा स्टोर्स यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५००० दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. रिसिंग बिल्डर्स यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्या प्रकरणी रू. १०००० चा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत राहुल मिश्रा यांच्यावर रस्त्यालगत कचरा टाकल्याप्रकरणी रू. ५००० दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने ०५ प्रकरणांची नोंद करून रू. ३०००० दंड वसुल केला.








