spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

२ फेब्रुवारीला स्वीकारलेजातील महापौर, उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र

– नवनिर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा ६ फेब्रुवारी

नागपूर :- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेत महापौर(महिला), उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार असून, १६ स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुसार महापौर, उपमहापौर पदासाठी येत्या सोमवार २ फेब्रुवारी रोजी सिव्हील लाईन्स येथील मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृह येथे सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. संबंधित विशेष सभेची सूचना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली आहे.

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी महापौर, उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याकरिता पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सूचना निर्गमित केली आहे. सूचनेनुसार, सर्व नवनिर्वाचित सदस्यांना शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे होणाऱ्या विशेष सभेला उपस्थित राहण्याचे सूचित केले आहे. विशेष सभेला सुरुवात झाल्यानंतर पीठासीन अधिकारी उमेदवारी अर्जांची छाननी करणार आहे. त्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांनी सभेला येताना निवडणूक विभागामार्फत देण्यात आलेले सूचनापत्र व निवडून आल्याचे प्रमाणपत्र (झेरॉक्स प्रत) सोबत आणावेत असे आवाहन मनपाच्या निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.

Popular Articles