नागपूर, ता. 28 : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. )शुक्रवार (ता.27) रोजी शोध पथकाने 45 प्रकरणांची नोंद करून 49,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 100/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/-रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 08 प्रकरणांची नोंद करून 21,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे/ वाहने धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करून 1000/- रूपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 5,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 21 प्रकरणांची नोंद करून 4,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 07 प्रकरणांची नोंद करून रु.7,000/- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. स्काय लाईन रियालिटी यांच्यावर बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले.धरमपेठ झोन अंतर्गत मे. नेगव तोमर यांनी रस्त्यालगत विनापरवानगी झोपडी उभारल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. एकविरा बिल्डर्स व मे.राई उद्योग बिल्डर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल प्रत्येकी रु. 10,000/- या प्रमाणे 20,000/- रूपयांची दंड वसूली करण्यात आली. नेहरूनगर झोन अंतर्गत रुषी पुटेवार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.आनंद किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. तसेच एक्सेलेंट ट्युशन क्लासेस यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.सतरंजीपुरा झोन अंतर्गत राजेश गजानन यांनी मनपाचे चेंबर गाडीने तोडल्यामुळे रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. आशीनगर झोन अंतर्गत मे. रेनायस्सन्स कॉलेज यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने 09 प्रकरणांची नोंद करून रू. 65,000/- दंड वसूल केला.




