नागपुर :- हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उघड न झालेलया गुन्हयांचा तपास करीत असतांना कळमेश्वर हद्दीतील केबल चोरीच्या गुन्हयात दिनांक २७/०५/२०२६ रोजी तांत्रिक पुराव्यावरून मोटर सायकल क. एम एच ४० / सी डब्ल्यु २२६७ या वाहनाचा गुन्हा करण्यासाठी वापर झाल्याचे निष्पन्न केले. नमुद मोटर सायकल मालक आरोपी क्रं १) चेतन प्रकाश अतकरी, वय २५ वर्षे रा. आदर्श नगर, वाडी, प्रगती कन्या शाळेचे मागे, नागपुर याला ताब्यात घेतले. नमुद आरोपीला ताब्यात घेवुन त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करीत असतांना पोलीसांनी आरोपी क्रं २) जय अशोक वधारे वय ३३ वर्षे रा. प्लॉट न.१३७, वार्ड क. ०३, टेकडी वाडी श्रीकृष्ण मंदीर जवळ, खडगाव रोड वाडी, क्रं ३) आकाश मुन्नालाल पवार, वय ३१ वर्षे रा. बरारू ता.जि. सागर पोलीस ठाणे केट (मध्यप्रदेश) ह.मु. विश्वास नगर राधाकृष्ण मंदीर जवळ काटोल रोड गिटीखदान नागपुर, क्रं ४) उमेश चिंदुजी फरकाळे, वय ३२ वर्षे रा जामठी गणेशपुर ता वरूड जि. अमरावती ह.मु. गायत्री कॉलनी शिवनगर राज अवर मानकापुर नागपुर गिरधारी वारंगे चे घरी किरायाने, क्रं ५) मंगेश प्रकाश सिंगारे, वय ४३ वर्षे रा. प्लॉट न.४२८ ओम नगर नेहरू नगर कार्पोरेशन ऑफीस जवळ सक्करदरा नागपुर या आरोपीतांचा गुन्हयात सहभाग असल्याची माहीती प्राप्त झाली. पोलीसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन कळमेश्वर आणि कोंढाळी हद्दीत केबल चोरी करून त्यातील कॉपर वायर काढुन विकी केल्याबाबत माहीती दिली.
पोलीसांनी पंचासमक्ष गुन्हा करण्याची वापरलेली मोटर सायकल एम एच ४० / सी डब्ल्यु २२६७ आणि एम एच ४० सी एस ५२१३ आणि कॉपर तार विकी करून मिळवलेले रोख रक्कम ९५,०००/- रूपये असा एकुण २,४५,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वर पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
उघडकीस आणलेले गुन्हे खालीलप्रमाणे आहे.
१). पो.स्टे. कळमेश्वर अप.क. ५५८/२६ कलम ३०३(२), ३२४ (४),६२,३ (५) भान्यासं
२). पो.स्टे. कळमेश्वर अप.क. २५३/२६ कलम ३०३(२) भान्यासं
३). पो.स्टे. कळमेश्वर अप.क. २९७/२६ कलम ३०३(२) भा.न्या.सं.,
४). पो.स्टे. कळमेश्वर अदखलपात्र अप.क. ७०/२६ कलम ३०३(२) भा. न्या.सं.,
५). पो.स्टे. कोंढाळी अप. क. १६५/२६ कलम ३०३ (२) भा.न्या.सं.,असे एकुण ५ गुन्हे उघड झाले आहे.



