कळमेश्वर :- पोलीस स्टेशन कळमेश्वरच्या अभिलेखावरील सराईत आरोपी नामे चेतन विजय हेलोंडे, वय २६ वर्षे, रा. सावंगी तह. सावनेर, जि. नागपूर याचे विरूध्द साथीदारांसह गंभीर दुखापत पोहचविणे, रस्त्याने अडवणुक करणे, अश्लील शिवीगाळ करुन मारहाण करुन जिवाने मारण्याची धमकी देणे, अवैद्य दारु विक्री करणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन मारहाण करणे या सारखे गंभीर गुन्हे नोंद आहे. नमुद आरोपी हा असे गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे. त्याच्या असमाजिक कृत्याची माहीती पोलीसांना देणाऱ्या लोकांमध्ये तो भय निर्माण करून दहशत पसरवित होता. नागपुर ग्रामीण पोलीसांना त्याचेविरूध्द जेव्हा जेव्हा तकारी प्राप्त झाल्या त्या त्या वेळी गंभीर दखल घेवुन त्याचे विरूध्द गुन्हे नोंद केले व त्याला अटक केले आहे. पोलीसांनी आरोपीचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी त्याचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. तरीसुध्दा आरोपीने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली.
आरोपींचे कृत्य समाजिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने तसेच नमुद आरोपी समाजासाठी धोकादायक ठरत असल्याने हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधीक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली कळमेश्वर पोलीसांकडुन एमपीडीए कायदयान्वये कार्यवाही करण्यात आली. जिल्हाधिकारी, नागपुर यांनी सराईत गुन्हेगार चेतन विजय हेलोंडे, वय २६ वर्षे, रा. सावंगी तह. सावनेर, जि. नागपूर याचे विरूध्द स्थानबध्दतेता आदेश काढला असता कळमेश्वर पोलीसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेवुन दिनांक २७/०५/२०२६ रोजी त्याला तात्काळ ताब्यात घेतले नमुद आरोपीला अटक करून जिल्हा कारागृह नागपुर येथे दाखल करण्यात आले.



