spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 52 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. मंगळवार (ता.14)शोध पथकाने 52 प्रकरणांची नोंद करून 41,100 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विसर्जन करणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 4,000 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 300 रूपयाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 6 प्रकरणाची नोंद करून 2,400 रूपयाची वसुली करण्यात आली.

मॉल,उपहारगृहे,लॉजिंग,बोर्डिंगचे हॉटेल,सिनेमाहॉल,मंगल कार्यालये,कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 7 प्रकरणाची नोंद करून 14,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने रस्ता,फुटपाथ व मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 7,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे व कचरा शुल्क न भरणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून रू.5,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 17 प्रकरणांची नोंद करून 3,400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. कॉसमॉस बिल्डकॉन यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. जोशी समोसा हॉटेल यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्याने व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. राजेश पटेल यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. हनुमाननगर झोन अंतर्गत मे. विजय इंफ्रा व मे. अंजनी सिटी स्काय अपार्टमेंट यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे प्रत्येकी रू.10,000 या प्रमाणे रू. 20,000 चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत राम धर्मे यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. टिंकू सावजी भोजनालय यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्याने व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. हॉटेल अल झमझम यांनी रस्त्यालगत हॉटेलचा कचरा टाकल्याने व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. रामभाउ किराणा स्टोअर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 9 प्रकरणांची नोंद करून रू.55,000 दंड वसुल केला.

Popular Articles